राजकारण
मनोज जरांगे पाटील आज घेणार एक मोठा निर्णय
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचे पडसाद राज्यभरात उमटत असून राज्याचे राजकारणही चांगलेच तापले आहे. याठिकाणी राजकीय नेत्यांनी भेट दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणचा आज आठवा दिवस आहे. सरकारच शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणार आहे. सरकारने अध्यादेश घेऊन यावं, नाहीतर आजपासून पाण्याचा त्याग करणार अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
आज सरकारी अध्यादेश आला नाही, तर पाच वाजल्यापासून पाण्याचा त्याग करणार. मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.