मिलिंद नार्वेकर आमच्या संपर्कात; शिरसाटांचा दावा

मिलिंद नार्वेकर आमच्या संपर्कात; शिरसाटांचा दावा

राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी ठाकरे गटाकडून मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी ठाकरे गटाकडून मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. मिलिंद नार्वेकर आमदार नसतानाही सभागृहात बसले. आदित्य ठाकरेंनी त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर नार्वेकर उठून सभागृहाच्या बाहेर गेले. परंतु, यावरुनच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला असून मिलिंद नार्वेकर आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

मिलिंद नार्वेकर आमच्या संपर्कात; शिरसाटांचा दावा
2024 मध्ये स्वराज पक्ष निवडणुका लढाविणार,समविचारी पक्षाशी युती करणार - संभाजीराजे छत्रपती

मिलिंद नार्वेकरांना सभागृहात यायची घाई झाली आहे. उद्धव ठाकरे देखील त्यांना आता जवळ करत नाही. यामुळे ते आमच्या संपर्कात आहे. त्यांच्या आमदारकीचा मार्ग शिंदे गटातून जातो. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर आमच्याकडे किती इन्कमिंग आहे हे कळेल, असा निशाणा शिरसाटांनी साधला आहे.

तर, शिवसेनेने व्हिप बजावल्याने ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. परंतु, आम्ही नियमानुसार व्हिप बजावू शकतो, असे उत्तर संजय शिरसाटांनी दिले आहे. तर, न्यायालयातील सुनावणी झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतील, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

दरम्यान, नार्वेकर हे अनेक वर्षांपासून शिवसेनेत काम करत आहेत. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात मिलिंद नार्वेकर. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका केली होती. तसेच 'मातोश्री'च्या वर्तुळात त्यांना विशेष महत्त्व आहे. शिंदे हे शिवसेनेच्या आमदारांना घेऊन सुरतमध्ये गेले होते. तेव्हा शिंदे यांची समजूत काढण्यासाठी शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांनाच पाठवले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com