Abdul Sattar
Abdul Sattar Team Lokshahi

पत्रकारांचा अवमान करणाऱ्या 'त्या' विद्यापीठ अधिकाऱ्यांना मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुनावले

वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितले, याबाबत समजताच मंत्री अब्दुल सत्तार यां अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले
Published by :
Sagar Pradhan

दापोली येथे आज ५० वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक २०२२ आयोजित केली होती. यावेळी येथील कृषि विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत असभ्य वर्तन करत बाहेर जाण्यास सांगितले. यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी सर्व पत्रकारांची मनधरणी करत त्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.

Abdul Sattar
माध्यमातून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, 'त्या' व्हिडिओवर बच्चू कडूंचे स्पष्टीकरण

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या वतीने ५० वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक २०२२ दापोली येथे आज पार पडली. यावेळी कृषि मंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. कृषी प्रदर्शन पाहत असताना कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्याने “सगळ्यांनी बाजूला व्हा, मी प्रदर्शन पाहतो” असे म्हणत वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितले.

यावेळी कृषी मंत्री सत्तार प्रदर्शनातील प्रत्येक विषयाची माहिती घेत होते. त्यांना याबाबत समजताच त्यांनी त्या अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. मला पत्रकारांशी संवाद साधायचा आहे, असे म्हणत त्यांनी पत्रकारांची झालेल्या प्रकाराबाबत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com