BJP Worker Krushna Parulekar
BJP Worker Krushna ParulekarTeam Lokshahi

डोंबिवलीत भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करणारी अदृश्य शक्ती कोण?

मंत्री रविंद्र चव्हाण यांचा कार्यकर्ते कृष्णा परुळेकर यांना मारहाण झाली.
Published by :
Vikrant Shinde

अमजद खान | डोंबिवली: मंत्री रविंद्र चव्हाण यांचा कार्यकर्ते कृष्णा परुळेकर यांना मारहाण झाली. या हल्लेखोराच्या विरोधात कायदेशीर करावाई झाली पाहिजे या मागणीसाठी भाजपचे शिष्टमंडळ डीसीपींना भेटले. मारहाण करणाऱ्याचे नाव पोलिसांना दिले गेले आहे. या आधी भाजप कार्यकर्ते मनोज कटके यांच्यावर हल्ला करणारा आरोपी मोकाटच आहे. आत्ता भाजपची सत्ता असताना भाजपच्या एका मोठय़ा कार्यकत्र्याला मारहाण झाली आहे. अखेर डोंबिवलीत मंत्री चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांवर सातत्याने हल्ला करणारी ती अदृश्य शक्ती कोण आहे याचा शोध लागणार की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.

BJP Worker Krushna Parulekar
कल्याणमध्ये रस्त्यावरील कमानी आणि बॅनरबाजीचा प्रश्न ऐरणीवर

कल्याण भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी, पदाधिकारी नंदू परब, नंदू जोशी यांच्यासह कृष्णा परुळेकर या भाजप कार्यकर्त्याने आज कल्याणचे डिसीपी सचिन गुंजाळ यांनी भेट घेतली. कृष्णा परुळेकर हे मंत्री चव्हाण यांचे निकटवर्तीय भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांचा असा आरोप आहे की, बुधवारी रात्री आमदारांच्या कार्यालयाकडे जात असताना एका ठिकाणी एक इसम त्यांना भेटला. त्याने वाद घालून कृष्णाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या तोंडावर मास्क होता. त्याने रिक्षातून पळू जाण्याचा प्रयत्न केला. कृष्णा यांनी त्याचा पाठलाग केला. कोपर रोड परिसरात तो त्याच्या हाती लागला. त्याने झटापट करुन त्याच्या तोंडावरील मास्क काढला. तो पूजन शुक्ला असल्याचे कृष्णा याने लगेचच ओळखले. पूजन शुक्ला हा एका राजकीय व्यक्तिचा समर्थक आहे.

या प्रकरणी भाजपच्या नेत्याकडून शुक्लाच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या पूर्वी मनोज कटके या कार्यकर्त्या वर भ्याड हल्ला करण्यात आला होता. कटके यांचेही आरोपी सापडलेले नाही. आत्ता भाजप सत्तेत आहे. त्यामुळे परुळेकर यांच्यावर हल्ला करणा:या आारोपीविरोधात कारवाई होणार का असा प्रश्न आहे. अखेर अशी कोणती अदृश्य शक्ती आहे. जी भाजप कार्यकर्त्यांना लक्ष्य करुन त्यांच्यावर हल्ले करीत आहेत अशी चर्चा राजकीय वतरुळात रंगू लागली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com