काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले आमदार फुटण्याच्या तयारीत; दानवेंचं मोठं वक्तव्य

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले आमदार फुटण्याच्या तयारीत; दानवेंचं मोठं वक्तव्य

शिंदे गट फुटणार, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली

रवी जयस्वाल | जालना : शिंदे फडणवीस सरकारमधील अंतर्गत वाद आता समोर येत आहे. बच्चू कडू आणि रवी राणा यांचा वाद आता पोलीस स्टेशनपर्यंत गेला आहे. एक नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ठोस भूमिका घेतली नसल्यास आपण धमाका करणार असल्याचा इशाराही कडूंनी दिला. यामुळे शिंदे गट फुटणार, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याचं मोठं वक्तव्य दानवेंनी केलं आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले आमदार फुटण्याच्या तयारीत; दानवेंचं मोठं वक्तव्य
बच्चू कडूंनी स्वाभिमान घाण ठेवला तरी...; सुषमा अंधारेंचा घणाघात

रावसाहेब दानवे म्हणाले की, आम्ही कोणताही राजकीय पक्ष फोडणार नाही असं आम्ही म्हणत आलोत. मात्र, अंतर्गत लाथाळीमुळं हे सरकार पडलं.आणि शिंदे आणि भाजप यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं. हे सरकार आम्हाला टीकवायचं आहे म्हणून आम्ही शिंदे गटातला एकही आमदार भाजपमध्ये घेणार नाही. मात्र, आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले आमदार फुटण्याच्या तयारीत आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.

तर, आदित्य ठाकरे आजपासून अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर खरपूस टीका केली होती. खरे मुख्यमंत्री कोण आहेत हे देवालाच माहिती आहे. खोके सरकार हे कुठेही निवडणूक घ्यायला तयार नाही, ते निवडणुकीला घाबरत आहेत. 40 गद्दार जर निवडणुकीला घाबरले नसते तर, त्यांनी पदाचा राजीनामा दिला असता, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. याला रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरेंनी पातळी सोडून बोलू नये. वयाचं भान ठेवावं, असा सल्लाच दानवेंनी आदित्य यांना दिला आहे. त्याचरोबर खोतकर आणि माझ्यातली कटुता आता संपली असल्याचंही दानवे यांनी म्हंटले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले आमदार फुटण्याच्या तयारीत; दानवेंचं मोठं वक्तव्य
कर्नाटकात ऑपरेशन लोटस? आमदारांना ५० कोटींची ऑफर, पोलिसांची फार्महाऊसवर धाड

दरम्यान, काहीच दिवसांपुर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होता. येत्या काही दिवसात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागलेला असेल. त्यानंतर बारामती, मुंबईमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या वर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकलेला असेल, असं वक्तव्य पडळकर यांनी केलं आहे. यानंतर आज रावसाहेब दानवेंनीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याचे म्हंटले आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येण्याच्या शक्यता वर्तुविण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com