Raj Thackeray | Uddhav Thackeray
Raj Thackeray | Uddhav ThackerayTeam Lokshahi

'पक्ष नसलेल्या पक्षाचे प्रमुख आता म्हणतात...' राज ठाकरेंची नाव न घेता उध्दव ठाकरेंवर टीका

शिवसेनेची रिफायनरीसाठी भूमिका नक्की काय आहे? असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला आहे.
Published by :
Sagar Pradhan

रत्नागिरी बारसू प्रकल्पावरून सध्या राज्याच्या राजकारणात गदारोळ सुरू आहे. या बारसू रिफायनरीला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे. त्यातच दुसरीकडे आज रत्नागिरीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी या प्रकल्पावर बोलत चौफेर टीका केली. पक्ष नसलेल्या पक्षाचे प्रमुख आता म्हणतात की लोकांच्या भावना असतील तसं होईल. मग बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबईचा महापौर बंगला हडपलात तेंव्हा जनतेला विचारलंत? असा सवाल करत त्यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे.

Raj Thackeray | Uddhav Thackeray
शिवसेनेची भूमिका नक्की काय आहे रिफायनरींबाबत? रत्नागिरीमधील राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मु्द्दे

काय म्हणाले राज ठाकरे?

बारसू प्रकल्पाबाबत शिवसेनेच्या भूमिकेवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, शिवसेनेची भूमिका नक्की काय आहे रिफायनरींबाबत? खासदार म्हणतात होणार नाही, पक्ष नसलेल्या पक्षाचे प्रमुख आता म्हणतात की लोकांच्या भावना असतील तसं होईल. मग बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबईचा महापौर बंगला हडपलात तेंव्हा जनतेला विचारलंत? शिवसेनेची रिफायनरीसाठी भूमिका नक्की काय आहे? असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला आहे. इथल्या जमिनी हड्पणे, त्यातून बक्कळ पैसा कमवणं इतकंच इथल्या लोकप्रतिनिधींचं उद्दिष्ट आहे हे विसरू नका. माझी कोकणवासीयांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला फसवणाऱ्या ह्या लोकांना एकदा धडा शिकवाच. असे त्यांनी आवाहन करत त्यांनी उध्दव ठाकरेंचे नाव न घेता टीका केली.

पुढे ते म्हणाले की, जनतेचं हित कशात आहे? त्यांना घरदार सोडावं लागणार नाही ही काळजी सरकारने घ्यायची असते. आता हे काय सांगत आहेत तुमची भावना ती आमची भावना? बाबांनो हे सगळे फसवत आहेत. तुम्हाला मूर्ख बनवत आले आहेत हे सगळे आजपर्यंत. थोडा विचार करा या सगळ्या गोष्टींचा. हे सगळे कधी या प्रदेशाची धूळधाण करतील तुम्हाला कळणारही नाही. सगळ्यांचे काही ना काही तरी हेतू आहेत. व्यापारविषयक हेतू आहेत. या सगळ्या गोष्टींमधून आपलं कोकण वाचवा म्हणूनच मी रत्नागिरीत आलो. मी सांगितलेल्या गोष्टींबद्दल गांभीर्याने विचार करा असंही आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com