'सूर बदले बदले हैं, पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे'

'सूर बदले बदले हैं, पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे'

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना बुधवारी मुंबई सत्र न्यायालयाने जामीन दिला. यामुळे तब्बल 102 दिवसांनी संजय राऊत जेल बाहेर आले आहेत.

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना बुधवारी मुंबई सत्र न्यायालयाने जामीन दिला. यामुळे तब्बल 102 दिवसांनी संजय राऊत जेल बाहेर आले आहेत. यानंतर आज राऊतांनी पहिल्यादांच माध्यमांशी संवाद साधला. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसे नेते गजानन काळे यांनी पिंजऱ्यातला वाघ मांजरीप्रमाणे, असे म्हणत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

'सूर बदले बदले हैं, पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे'
राज्याचे नेतृत्व फडणवीसांकडे; राऊतांकडून फडणवीसांचे कौतुक,म्हणाले कटुता संपवायचीये

तुरुंगातून सुटल्यानंतर संजय राऊत यांनी कोणावरही टीका अथवा आरोप केलेले नाहीत उलट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यावरुनच गजानन काळे यांनी ट्विटरद्वारे शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले की, कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत होता. सूर बदले बदले हैं जनाब के. राजकारणातील अलका कुबल यांना हे पाहून पुन्हा अंधारात अश्रू अनावर होतील. लवंडे जोमात, मातोश्री कोमात, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.

'सूर बदले बदले हैं, पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे'
तुरुंगात राहणं फारच कठीण; संजय राऊतांची प्रतिक्रिया

काय म्हणाले होते संजय राऊत?

काही दिवसांपुर्वी देवेंद्र फडणवीसांनी, महाराष्ट्राच्या राजकारणातील कटुता आता राजकीय वैमनस्यापर्यंत गेली आहे. त्यामुळे ही कटुता कशी कमी करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे म्हंटले होते. या भूमिकेचेही संजय राऊतांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले, मी तुरुंगात होतो. तेव्हा फडणवीस म्हणाले होते कटुता थांबली पाहिजे. मी दोन-तीन दिवसांनी फडणवीसांची भेट घेणार आहे. तसेच, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री करत आहेत. ते चांगले निर्णय घेत आहेत, असे कौतुकही त्यांनी केले.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com