...म्हणूनच हल्ली मी कमी बोलतो; राज ठाकरेंनी सांगितले कारण

...म्हणूनच हल्ली मी कमी बोलतो; राज ठाकरेंनी सांगितले कारण

महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधानाबाबत सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. यावर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे.

मुंबई : महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधानाबाबत सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व त्यांच्यानंतर भाजपा आणि शिंदे गट आणि इतरही काही पक्षातील नेत्यांनी महापुरुषांबाबत अपमानास्पद टिप्पणी केली होती. यामुळे मोठे वादंग निर्माण झाले होते. यावर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे.

...म्हणूनच हल्ली मी कमी बोलतो; राज ठाकरेंनी सांगितले कारण
'जो हा अपमान सहन करताहेत, ते गां**ची अवलाद', संजय राऊत संतापले

राज ठाकरे म्हणाले की, मी अनेक भाषणांमधून सांगितलं आहे की जातीजातीत तेढ निर्माण करणं, महापुरुषांबद्दल अवमानकारक बोलणं. हे काय राजकारण नव्हे. कोणीही इतिहासतज्ज्ञ होतंय, कारण हे दाखवतायेत ना? दाखवायचं बंद केलं तर हे सगळं बंद होईल. मूळ प्रश्न बाजूला ठेऊन हे कायतरी ह्यांचं 24 तास सुरूच आहे. म्हणूनच हल्ली मी कमी बोलतो. पवार साहेब जे म्हणतात ना, मी कधीतरी उगवतो ते बरोबरच आहे, असे मिश्कील उत्तर त्यांनी दिले आहे.

अडीच ते तीन वर्षांपूर्वी एकमेकांना शिव्या घालत होते. ते आता मांडीला मांडी लावून बसले आहेत. पहाटे सहा वाजता शपथ घेतली. जे चांगल आहे त्याला चांगलं म्हणणार आणि वाईटला वाईट म्हणणार, असेही त्यांनी म्हंटले आहे. विचारांना 100 टक्के स्वातंत्र्य असायला हवंच. राज्यकर्त्यांचा स्वभाव हा मोकळा-ढाकळा असायला हवं. सगळं स्वीकारता यायला हवं, असेही त्यांनी सांगितले आहे.

...म्हणूनच हल्ली मी कमी बोलतो; राज ठाकरेंनी सांगितले कारण
शिवसेना व वंचितच्या युतीला राष्ट्रवादीचा विरोध? शरद पवार म्हणाले...

सूडाच्या राजकारणापेक्षा बडबडी राजकारण खूप सुरु आहे. त्यामुळं हल्लीची पिढी राजकारणाकडे पाहून काय म्हणत असतील. ही अशी बकबक करायला यायचं असतं का? यातून काय घ्यायचं भावी पिढीने. हिंदी न्यूज चॅनेलचे फॅड मराठीत ही आलंय, अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे.

राज्यकर्ता हा मोठ्या मनाचा असावा त्याचा व्यापारी नसावा. राजकारणात पैसे हे माध्यम आहे. पण मन जिंकायला लागतात तेव्हाच राजकारण होतं. नुसते पैसे वाटून होत नाही, तसं असतं तर मतदानाचा टक्का कमी झाला नसता. राजकारण म्हणजे फक्त निवडणुका नसतात, विविध अंगांनी कामं करता येतात. तुमच्या कामाला राजकारणाची धार नसेल तो पर्यंत सामाजिक कार्य होऊ शकत नाही. प्रत्येक मूलभूत गरजांशी राजकारण जोडलेल आहे. मग तुम्ही राजकारणाला तुच्छ का मानत आहात, असा प्रश्नही राज ठाकरेंनी विचारला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com