Raj Thackeray. (File Photo: IANS)
Raj Thackeray. (File Photo: IANS)

मनसे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुकणार; राज ठाकरेंचा मुंबईत मेळावा

Published by :

मुंबई | महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत केव्हाही निघण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे निवडणुकीचं रणशिंग फुंकणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान शिवसेनेचा दसरा मेळावा झाल्यानंतर मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे नेमके कोणत्या विषयावर बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेच्या मेळाव्याची माहिती दिली आहे.

23 तारखेला मुंबईत मनसेचा मेळावा आहे. त्यात तुमची देखील काही उत्तर मिळतील. राज ठाकरे मेळाव्यात काय बोलतील हे माहीत नाही. पण ते आपली भूमिका जाहीर करतील आणि बऱ्याचशा गोष्टी या क्लिअर होतील, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

आज कांचन गुरू माँ आणि राज ठाकरे यांची भेट आणि हिंदू राष्ट्राची कल्पना यावरही त्यांनी सांगितल. मुळात आपला देश बहुसंख्याक हिंदूंचा देश आहे. त्यामुळे साहजिकच आहे की प्रत्येक हिंदू माणसाला वाटणार की हिंदूराष्ट्र व्हावं. त्यात त्यांची काहीच चूक नाही. परंतु परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहली आहे त्याप्रमाणे आपण सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन जात आहोत. त्यामुळे सर्वधर्म समभाव हे घटनेप्रमाणे चालू आहे. इतर भाषिकही या देशात गुण्या गोविंदाने राहतात. म्हणून ही मागणी काही नवीन नाही. ही जुनीच मागणी आहे. कांचनगिरी गुरू माँ पण साहेबाना भेटून गेल्या त्यांची पण तीच अपेक्षा आहे.राज ठाकरे येत्या 23 तारखेला होणाऱ्या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com