'मी पुन्हा येईल' मोदींसाठी सोप्पे नाही; नव्या सर्व्हेने भाजपचं वाढवलं टेन्शन

'मी पुन्हा येईल' मोदींसाठी सोप्पे नाही; नव्या सर्व्हेने भाजपचं वाढवलं टेन्शन

यंदा मोदी लाट कायम राहणार की इंडिया आघाडीची यशस्वी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. नुकत्याच केलेल्या एक सर्व्हेने भाजपचं टेन्शन वाढवलं आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Lok Sabha Election survey : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत इंडिया आघाडीची मोट बांधली आहे. परंतु, पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन मी पुन्हा येईनची घोषणा केली आहे. यामुळे यंदा मोदी लाट कायम राहणार की इंडिया आघाडीची यशस्वी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. नुकत्याच केलेल्या एक सर्व्हेत इंडिया आघाडीची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. मात्र, एनडीए आणि इंडिया आघाडीत कांटे की टक्कर होताना दिसणार आहे. परंतु, निवडणुका झाल्या तर केंद्रात मोदींचीच सत्ता पुन्हा येणार असल्याचे सर्व्हेतून दिसत आहे.

सर्व्हेनुसार, आज लोकसभा निवडणुका झाल्या तर 543 जागांपैकी एनडीएला 296-326 जागा मिळू शकतात. तर, इंडिया आघाडीला 160 ते 190 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एनडीएला 42 टक्के मते आणि इंडिया आघाडीला 40 टक्क्यांपर्यंत मते मिळण्याचा दावा करण्यात येत आहे. अर्थातच इंडिया आघाडीची मतांची टक्केवारी वाढूही शकते. या सर्व्हेने भाजपचं टेन्शन निश्चितच वाढवलं आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानतंर दोन्ही पक्षांनी भाजपविरोधात कंबर कसली आहे. राज्यभरात सभांचा धडाका लावला आहे. सभांना मिळणारा प्रतिसाद मतात रुपांतरीत होणार का, असा प्रश्न सर्वांनाच आहे. परंतु, सर्व्हेनुसार महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांपैकी सर्वाधिक जागा महायुतीला मिळण्याची शक्यता आहे. राज्यात महायुतीला 28-32 मिळतील. तर इंडिया म्हणजेच मविआला 15-19 जागांवर समाधान मानावे लागेल. याशिवाय इतर 1-2 जागा मिळण्याचा अंदाज आहे. असे असले तरी 2024 ची लोकसभा वाट भाजपसाठी सोप्पी नसणार हे निश्चित.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com