'मोदी जी आव्या गुजरात मा' अमृता फडणवीसांनी गुजराती भाषेत दिल्या शुभेच्छा

'मोदी जी आव्या गुजरात मा' अमृता फडणवीसांनी गुजराती भाषेत दिल्या शुभेच्छा

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने आघाडीवर आहे. भाजपची गुजरातमध्ये ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असताना काँग्रेसची पीछेहाट सुरु आहे.
Published by :
shweta walge

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने जिंकले आहेत. भाजपची गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. काँग्रेसची पीछेहाट झाली आहे. गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा एकदा करिष्मा पाहायला मिळाला आहे. भाजपाने दीडशे पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीसांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

अमृता फडणवीसाचं ट्वीट

अमृता फडणवीस यांनी ट्विटरद्वारे भाजपचे गुजराती भाषेत शुभेच्छा दिल्या आहेत. त्या म्हणाल्या की, "केम छो , मजामा ?, मोदी जी आव्या गुजरात मा !!"

दरम्यान, गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत. राज्यातील 182 जागांपैकी भाजप 156 जागांवर विजयी झाले आहेत. तर काँग्रेसला केवळ 17 जागा मिळाल्या आहेत.आम आदमी पार्टी 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर इतरांना चार जागा मिळल्या आहेत. यानुसार भाजप सलग सातव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली आहे.

'मोदी जी आव्या गुजरात मा' अमृता फडणवीसांनी गुजराती भाषेत दिल्या शुभेच्छा
गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2022: भाजपाच्या आघाडीवरील उमेदवारांची संपूर्ण यादी
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com