राजकारण
पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळात मोठा बदल; मुख्यमंत्र्यांकडे असलेली खाती...
आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे.
आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु होत असून या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या खात्यांचा तात्पुरता भार शिंदे गटातील इतर मंत्र्यावर सोपवला आहे.
गुलाबराव पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन, उदय सामंत यांच्याकडे नगरविकास आणि माहिती तंत्रज्ञान, शंभूराज देसाईंकडे सामाजिक न्याय आणि दिव्यांग, दादा भूसे यांना परिवहन, अब्दुल सत्तारांकडे खनिकर्म आणि दीपक केसरकर यांच्याकडे पर्यावरण खातं देण्यात आलं आहे.
धिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही खाती वर्ग करण्यात आली आहे. ही सर्व खाती शिंदे गटाच्या आमदारांनाच देण्यात आली आहे. खाते वाटप झाल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जी खाती होती त्याचा तात्पुरता भार संबंधित मंत्र्यांवर दिला आहे. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनाच पहिला दिवस सत्ताधारी की विरोधक कोण गाजवणार याकडे लक्ष लागले आहे.