अजित पवारांना 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा - अनिल पाटील

अजित पवारांना 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा - अनिल पाटील

राज्यात एकापाठोपाठ एक राजकीय घडामोडी घडत आहेत.
Published by  :
Siddhi Naringrekar

राज्यात एकापाठोपाठ एक राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत युती सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. त्यांच्यासोबत काही आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. आज शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठका आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आज मुंबईत दोन मेळावे होणार आहेत. अजित पवार यांच्या गटाचा मेळावा बॅण्ड्रा एमआयटी येथे होणार आहे तर शरद पवार गटाचा मेळाला यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत एकूण 54 आमदार आहेत. अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेच्या 42 आणि विधान परिषेदच्या 2 आमदारांच समर्थन आहे. त्यामुळे आता शरद पवार यांच्या गटाकडे फक्त 11 आमदारांच समर्थन असल्याची माहिती मिळत आहे. 

यावर अजित पवार गटाचे प्रदोद अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, 40 पेक्षा जास्त आमदार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे थोड्याच वेळात समजले की अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com