Navneet Rana | Devendra Fadnavis
Navneet Rana | Devendra Fadnavis Team Lokshahi

आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, नवनीत राणांचे मोठे विधान

सगळ्यांसाठी ते उपमुख्यमंत्री असतील पण आमच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत. असे कौतुक खासदार नवनीत राणा यांनी यावेळी केलं.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरू आहे. त्यातच दुसरीकडे राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यासाठी अमरावती पदवीधर मतदार संघातून भाजपने डॉ. रणजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. याच निवडणुकीसाठी आज अमरावतीमध्ये प्रचारसभा ठेवण्यात आली होती. याच प्रचारसभेत खासदार नवनीत राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत मोठे विधान केले आहे.

Navneet Rana | Devendra Fadnavis
"ठरवून काही पक्षांवर कारवाई" मुश्रीफांचा घरावरील छापेमारीनंतर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

नेमकं काय म्हणाल्या नवनीत राणा?

अमरावतीत पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत असताना नवनीत राणा म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांचे पाऊल ज्या ठिकाणी पडले मग ते गुजरात असो वा गोवा तिथे भाजपला घवघवीत यश मिळाले. देवेंद्र फडणवीस यांचे काम बोलते. त्यांच्या कामाची स्टाईल धडाकेबाज आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा डंका महाराष्ट्रात तर वाजतोच आहे, पण इतर राज्यातही त्यांच्या कामाची चर्चा होते. असे विधान त्यांनी यावेळी बोलताना केले.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, त्यांची समाजातील घटकांना न्याय देण्याची त्यांची भूमिका आणि धडाकेबाज कामासाठी फडणवीस नेहमी आपले वाटतात. सगळ्यांसाठी ते उपमुख्यमंत्री असतील पण आमच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत. असे कौतुक खासदार नवनीत राणा यांनी यावेळी केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com