खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाचवेळी बारामती दौऱ्यावर

खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाचवेळी बारामती दौऱ्यावर

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

विकास कोकरे, बारामती

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी सुळे यांच्या दौऱ्याची सुरुवात बारामती शहरातून करण्यात आली.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी संत गाडगे महाराज आणि संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून परिसरातील स्वच्छता केली.

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याची सुरुवात जळोची येथील कांचननगर येथील सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन करून करण्यात आले. आज सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच वेळी बारामती दौऱ्यावर आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com