पुण्यात निलेश राणेंच्या मालमत्तेवर पालिकेची कारवाई

पुण्यात निलेश राणेंच्या मालमत्तेवर पालिकेची कारवाई

पुण्यात निलेश राणेंच्या मालमत्तेवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

पुण्यात निलेश राणेंच्या मालमत्तेवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कन येथील व्यावसायिक जागेचा कर न भरल्याने जागा सील केल्याची माहिती मिळत आहे. मालमत्ता थकबाकीप्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे.

तब्बल तीन कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची थकबाकी असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यात अनेकांनी मालमत्ता कर थकवल्याचे समजते. सध्या महापालिकेकडून कर वसुली केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com