आमचा टोल मुक्तीला पाठिंबा, मात्र... : नाना पटोले

आमचा टोल मुक्तीला पाठिंबा, मात्र... : नाना पटोले

राज ठाकरे यांच्या इशाऱ्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : राज ठाकरे यांनी प्रत्येक टोलनाक्यावर मनसैनिक उभे राहतील. लहान वाहनांकडून टोल घेतल्यास टोलनाका जाळून टाकू, असा इशारा दिला आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टोलमुक्तीला पाठिंबा असल्याचे जाहिर केले आहे.

आमचा टोल मुक्तीला पाठिंबा, मात्र... : नाना पटोले
तुमच्यात राजीनामा देण्याची हिम्मत नाही, लाज...; आदित्य ठाकरेंची सरकारवर घणाघात

नाना पटोले म्हणाले की, 2014 मध्ये जे खोटे स्वप्न दाखवले होते त्यात टोल मुक्तीचे देखील स्वप्न दाखवले होते. आमची सत्ता आली तर आम्ही टोल मुक्त करू, असे आश्वासन दिले होते. आमचा देखील टोल मुक्तीला पाठिंबा आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या प्रश्नावर मला प्रतिक्रया द्यायचे नाही, असे म्हणत त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले

तर, आमदार अपात्रेबाबत बोलताना ते म्हणाले, आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सत्तेचा दुरुपयोग भाजपचे पहिला ब्रीद वाक्य आहे. केंद्र सरकारच्या विरोधात जे बोलेल त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. राष्ट्रवादीने घोटाळा केला असे आरोप करतात आणि नंतर त्यांचे लोकांना मंत्री करतात, अशी टीका पटोलेंनी भाजपवर केली आहे.

दरम्यान, नाशिकमधील ड्रग्स प्रकरण गंभीर आहे. या संदर्भात आमच्याकडे देखील काही माहिती मिळाली आहे. काही आमदार देखील यात सहभागी आहेत. आम्ही येत्या अधिवेशनात आमच्याकडे पुरावे देणार आहोत. नाशिक बचावसाठी आम्ही आजपासून आंदोलन करणार आहोत. नाशिकमधील शाळेत ड्रग्स दिले जात असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com