शिवाजी पार्कचा मेळावा तमाशाकरांचा; राणेंचा उध्दव ठाकरेंवर घणाघात

शिवाजी पार्कचा मेळावा तमाशाकरांचा; राणेंचा उध्दव ठाकरेंवर घणाघात

दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदे गट-भाजपवर कडाडून टीका केली. याचा आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी समाचार घेतला.

मुंबई : दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदे गट-भाजपवर कडाडून टीका केली. याचा आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत समाचार घेतला. शिवाजी पार्कचा मेळावा तमाशाकरांचा मेळावा होता. पोकळ वल्गना होती, असे टीकास्त्र नारायण राणे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर सोडले आहे.

नारायण राणे म्हणाले की, शिवाजी पार्क या मंचावर वैचारिक पातळी नव्हती. बाळासाहेब विचारांचे सोन द्यायचे. हे ते सोने नाही, त्यांनी शिव्या द्यायचे काम केले आहे. बाळासाहेब यांच्या विचारांची प्रेरणा मिळत होती. त्यावेळचे विचारतून आम्ही घडलो. त्यावेळी विचार आणि आणि आताचे विचार यात फरक आहे. शिवाजी पार्कचा मेळावा तमाशाकरांचा मेळावा होता. केवळ पोकळ वल्गना होती, अशी टीका त्यांनी उध्दव ठाकरेंच्या मेळव्यावर केली आहे

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, आरएसएस प्रमुखांचे नाव घेऊन टीका करायचे. हाच त्या काळातील वक्ते आणि आताच्या वक्त्यांमध्ये फरक आहे की ते नाव घेत नाहीत. आमच्या नेत्यांवर टीका करतात. मी मागील वेळीच म्हणालो होतो आमच्या नेत्यांविषयी ऐकून घेणार नाही. मोदीच्या नावाने निवडून आले आणि त्यांच्याविरोधात बोलतात. युतीत निवडून आले आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले. उद्धव ठाकरे लबाड लांडगा माणूस, खोटारडा आहे. उद्धव ठाकरे यांनी आमच्या नेत्यांबद्दल जर बोलले तर आम्ही सभा होऊ देणार नाही, असा इशाराच राणेंनी दिला आहे.

शिवसेना ज्यांनी मोठी केली. त्यात एकनाथ शिंदे आणि 40 आमदार आहेत. तु एखादी केस तरी अंगावर घेतली काय? काय केल दंगलीत? जीव वाचवलं? आयत्या बिळावर नागोबा. बाळासाहेबांचे नाव घेण्याचा त्यांना अधिकार नाही. बाळासाहेब आमची काळजी घ्यायची. शिवसैनिकवर विश्वास, जीव टाकायचे. आजही साहेबांची आठवण आली तर डोळ्यांत पाणी येते. त्यांचा शब्द कधी मोडला नाही, असेही नारायण राणेंनी म्हंटले आहे.

ते पुढे म्हणाले, शरगिल उस्मानी याला मुख्यमंत्री पद गेलं. तरीही अटक केली नाही. दाऊदशी संबंध असलेल्या नवाब मलिक यांचे मंत्रीपद कायम ठेवलं. हिंदुत्वाशी तडजोड करून मुख्यमंत्री पद मिळाले. या माणसाने हिंदुत्ववर बोलू नये. ह्या माणसाचे बेगडी हिंदुत्व आहे. कोण तुम्ही अपघाताने मुख्यमंत्री झालात. तुला मुख्यमंत्री पद समजलं नाही. 5 तारखेला सांगितलं पाहिजे होते. मी अडीच वर्षात काय केले. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय केल ते सांगा, असा सवाल राणेंनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

दिशा सालियनवर अत्याचार करून खून केला. का नाही आरोपींना अटक झाली? त्यात कोण मंत्री होते? का वाचवलं त्यांना? लोकं चर्चा करतात आदित्य ठाकरे त्या केसमध्ये आहेत. आतापर्यंत मी नाव घेत नव्हतो. पण, चर्चा सुरू आहे. आदित्य ठाकरे त्या केसमध्ये आहेत. म्हणून लपवालपवी सुरू केली. हे सर्व वाझेंनी मॅनेज केलं, अशा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मला मारण्यासाठी शकील व छोटा राजनला सुपारी दिली होती. तुझ्या सुपाऱ्याने नारायण राणेचे काही झालं नाही, तुला पुरून उरेल, असेही राणे यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com