कोकण माझ्या शब्दाबाहेर नाही; नारायण राणेंची रिफायनरीबाबत प्रतिक्रिया

कोकण माझ्या शब्दाबाहेर नाही; नारायण राणेंची रिफायनरीबाबत प्रतिक्रिया

नारायण राणे यांनी केली शिवसेनेवर टीका

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर स्थानिक जनतेच्या विरोधामुळे रिफायनरी प्रकल्पही राज्याबाहेर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तेथील परिस्थिती जाणून घेण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे कोकण दौरा केला. परंतु, कोकणात जाऊन काही उपयोग नाही. कोकण माझ्या शब्दाबाहेर नाही, असा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. दरम्यान, याआधीही त्यांनी आंदोलकांना जुमानत नसल्याचे म्हंटले होते.

नारायण राणे म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण करणार नाही.

दसरा मेळाव्याविषयी विचारले असता राणे म्हणाले, मेळावा हा एकनाथ शिंदेच घेणार आहेत. शिवसेनेला आता दसरा मेळावा घेण्याचा हक्क नाही. त्यांनी हा हक्क गमावलेला आहे. त्यांनी त्यांच्या काळात छापाछापी केली. जनतेला काहीच दिलं नाही, अशी टीका त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर केली.

कोकणात जाऊन काही उपयोग नाही. कोकण माझ्या शब्दाबाहेर नाही. ते तिथे गेले त्यांचा थीलर पणा बघायला. मी गेल्यावर माझ्या बाजूने सगळे येतील. त्यांना एकच शब्द सध्या सुचत आहे तो म्हणजे गद्दारी, असा घणाघात नारायण राणेंनी आदित्य ठाकरे यांच्यावर केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com