Delhi Murder : पुन्हा मोर्चा मेणबत्ती मार्च, मुली देशात इतक्याच सुरक्षित; नवनीत राणांची संतप्त प्रतिक्रिया

Delhi Murder : पुन्हा मोर्चा मेणबत्ती मार्च, मुली देशात इतक्याच सुरक्षित; नवनीत राणांची संतप्त प्रतिक्रिया

दिल्लीत घडलेल्या घटनेतील आरोपी साहिलला तात्काळ फाशी द्या. असं झाल्यास देशातील मुली स्वतःला सुरक्षित समजतील. खासदार नवनीत राणा.

सूरज दहाट | अमरावती : दिल्लीत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने चाकूने 20 वेळा वार करुन निघृणपणे हत्या केली आहे. भररस्त्यात ही घटना घडली असली तरी नागरिकांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली होती. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामुळे दिल्लीसह संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणावर अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी संतप्त प्रतिक्रिया देत दोषी व्यक्तींना न्यायालयाने तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Delhi Murder : पुन्हा मोर्चा मेणबत्ती मार्च, मुली देशात इतक्याच सुरक्षित; नवनीत राणांची संतप्त प्रतिक्रिया
नको रे बाबा संरक्षण! आडनावाच्या वादावरुन संभाजी राजेंचा गौतमी पाटीलला आधी पाठिंबा, आता युटर्न

दिल्लीतील शहाबाद परिसरात एका मुलीची साहिल नावाच्या आरोपीने भरवस्तीत निघृर्ण हत्या केली. ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. आता पुन्हा मोर्चा काढणे, रोड शो करणे, मेणबत्ती मार्च काढणे इतकंच आपल्या देशात होताना दिसेल. मुली आपल्या देशात इतक्यात सुरक्षित दिसतात. हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर याला शिक्षेसाठी दहा वर्षाची वाट पाहावी लागेल, अशी खंत नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे.

अशा प्रकरणातील दोषी व्यक्तींना न्यायालयाने तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी. यामुळे मुलींवर असे प्रसंग कुणी करायची हिंमत करणार नाही. आणि देशात मुलींना आपण सुरक्षित आहे, असं वाटायला लागेल. आपण ज्या देशात राहतो तो देश अगदी सुरक्षित आहे असं वाटेल, असं मत नवनीत राणा यांनी व्यक्त केलं आहे. खासदार या नात्याने नवनीत राणा हा मुद्दा सभागृहात देखील उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

दरम्यान, साहिल आणि अल्पवयीन मुलगी एकमेकांचे मित्र होते. मात्र काही कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. यानंतर साहिलने तरुणीला वाटेत अडवले. व तिच्यावर चाकूने 20 हून अधिक वेळा वार केले. याशिवाय दगडानेही डोके ठेचून हत्या केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात केला असून पोलिसांनी साहिलला उत्तरप्रदेशमधून ताब्यात घेतलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com