'24 वर्षांपासून काँग्रेस कमिटीच्या जागेवर राष्ट्रवादीचा ताबा, नैतिकता असेल तर...'

'24 वर्षांपासून काँग्रेस कमिटीच्या जागेवर राष्ट्रवादीचा ताबा, नैतिकता असेल तर...'

कमिटीची जागा कॉंग्रेसच्या ताब्यात देण्याची 'या' नेत्याने केली मागणी

संजय देसाई | सांगली : कॉंग्रेसमधून फुटून 1999 साली राष्ट्रवादी कॉंग्रेस स्थापना झाली. तेव्हापासून तब्बल 24 वर्षे तालुका काँग्रेस कमिटीच्या जागेवर राष्ट्रवादीने ताबा घेवून वापरली जात आहे. त्यांच्याकडे नैतिकता असेल तर त्यांनी कॉंग्रेस कमिटीच्या इमारतीची जागा तात्काळ सोडावी. वाळवा तालुका काँग्रेस कमिटीच्या ताब्यात द्यावी, असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि बोरगावचे सरपंच जितेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे..

'24 वर्षांपासून काँग्रेस कमिटीच्या जागेवर राष्ट्रवादीचा ताबा, नैतिकता असेल तर...'
ठाकरे व हिरवं सरकार असताना लव्ह जिहाद प्रकरण वाढलं; सोमय्यांचा घणाघात

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष यु.एन. देवर यांनी 25 मे 1955 साली प्रत्येक जिल्हा आणि तालुकास्तरावर काँग्रेस कमिटी करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार सांगली-सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे काँग्रेस कमिटीसाठी जागेच्या मागणीसाठी पत्र दिले होते. राष्ट्रीय काँग्रेसचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षांनी पत्रव्यवहार करून सांगली जिल्ह्यातील विटा, तासगाव आणि इस्लामपूर या तीन काँग्रेस कमिटीला मंजुरी घेतली होती. विटा आणि तासगाव येथील काँग्रेस कमिटी काँग्रेसच्या ताब्यात आहे. इस्लामपूरातील काँग्रेस कमिटीही कॉंग्रेसच्या ताब्यात मिळावी.

राज्यात महाविकास आघाडी एकत्र नांदत आहे. त्यामुळे काँग्रेस कमिटीवर राष्ट्रवादीने घेतलेला ताबा राष्ट्रवादी सोडेल. त्यासाठी फार संघर्ष करावा लागणार नाही. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते इस्लामपूर शहरात राष्ट्रवादी कार्यालयासाठी कोठेही जागा घेवू शकतात. त्यांनी मोठेपणा दाखवून जागा सोडावी आणि नैतिकता पाळतील, असा विश्वास असल्याची स्पष्टोक्ती जितेंद्र पाटील यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com