Ajit Pawar | Devendra Fadnavis
Ajit Pawar | Devendra FadnavisTeam Lokshahi

फडणवीसांच्या त्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, आमची काळजी...

“राष्ट्रवादी साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे” अशी टीका फडणवीसांनी केली होती.
Published by :
Sagar Pradhan

राज्याच्या राजकारणात सध्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेली असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली होती. “राष्ट्रवादी साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे” अशी टीका फडणवीसांनी केली होती. त्यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Ajit Pawar | Devendra Fadnavis
ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; पश्चिम बंगालमध्ये ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावर बंदी, चित्रपट निर्माते म्हणतात...

काय म्हणाले अजित पवार?

साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस यांना आमची काळजी करण्याचं कारणच नाही. 36 जिल्ह्यांपैकी आम्ही साडेतीन जिल्ह्यांपुरते मर्यादित असू तर त्यांच्यासमोर कुणी विरोधकच नाही. कारण शिवसेनेची त्यांनी काय अवस्था केली, आम्ही तर साडेतीन जिल्ह्यातील आहोत. काँग्रेसबद्दलही असेच दावे असतात. काँग्रेस संपली पाहिजे.असं ते वक्तव्य करतात. असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

पुढे त्यांना कर्नाटका निवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले की, 'आता काही सांगता येत नाही. आपण कुणीही ज्योतिषी नाही. प्रत्येकजण आपापल्या परिने सांगतंय. सुरुवातीच्या काळात काँग्रेसचं वातावरण चांगलंय असं मीडियात सातत्याने वाचायला मिळत होतं. नंतर बजरंग दलाबद्दल भूमिका घेतल्यानंतर मग तिथे एकदम भाजपच्या मोठ्या नेत्यांना बजरंगाची मूर्ती देण्याची परंपरा सुरु झाली. भावनिक माध्यमातून निवडणुकीचं वातावरण वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करण्यात आला.' असेही त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com