Girish Mahajan | Eknath Khadse
Girish Mahajan | Eknath KhadseTeam Lokshahi

महाजनांच्या विधानावर खडसे म्हणाले, आमच्या मुलाच्या मृत्यूमुळे आम्हालाच वेदना...

या वक्तव्यामुळे गिरीश महाजन यांच्या मनोवृत्तीचा हलकटपणा दिसून येत आहे.

भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंमध्ये अनेक दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरु आहे. मात्र, आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचे प्रत्युत्तर देताना गंभीर इशारा दिला आहे. तुम्हाला एक मुलगा होता त्याचं काय झालं? आत्महत्या झाली की खून झाला हे तपासण्याची गरज आहे असे म्हणत मला जास्त बोलायला लावू नका. याच इशाऱ्यानंतर आता खडसेंनी उत्तर दिले आहे.

Girish Mahajan | Eknath Khadse
महाजनांचा खडसेंना इशारा, मुलाची हत्या झाली की आत्महत्या? जास्त बोलायला लावू नका...

काय म्हणाले खडसे?

मंत्री गिरीश महाजन यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंततर ते म्हणाले की, गिरीश महाजन यांनी जे वक्तव्य केले आहे. ते अत्यंत नीच मनोवृत्तीचं प्रदर्शन करणारे आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे विनाकारण संशय निर्माण करण्याचा हेतू असल्याचेही त्यांनी सांगितले. रक्षा खडसे यांच्यावरही संशयाची सुई असल्याचे त्यांच्या या वक्त्यावरून दिसून येत आहे. असे ते यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले, या वक्तव्यामुळे गिरीश महाजन यांच्या मनोवृत्तीचा हलकटपणा दिसून येत आहे. माझ्या मुलाचा खून झाला की, आत्महत्या हा वाद विनाकारण संशयनिर्माण करण्याचा प्रयत्न गिरीश महाजन यांनी केला असल्याची टीकाही त्यांच्यावर केली आहे. आमच्या मुलाच्या मृत्यूमुळे आम्हालाच वेदना होत आहेत अशी खंतही खडसे यांनी यावेळी बोलवून दाखवली.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com