Hasan Mushrif
Hasan MushrifTeam Lokshahi

घरावर ईडीची छापेमारी; हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले…

हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. सकाळपासून मुश्रीफांच्या घरावर ईडीची छापेमारी सुरु आहे.

मुंबई : माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. सकाळपासून मुश्रीफांच्या घरावर ईडीची छापेमारी सुरु आहे. साखर कारखान्याच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही छापेमारी केली आहे. यावर हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

Hasan Mushrif
विरोधी पक्षावर दबावाचे राजकारण; मुश्रीफांवरील कारवाईवर राऊतांची प्रतिक्रिया

काय म्हणाले हसन मुश्रीफ?

माझ्या आणि माझ्या मुलीच्या घरावर ईडीने छापे टाकल्याची माहिती मला मिळाली आहे. मी कामानिमित्त बाहेगावी असल्याने फोनवरून मला ही माहिती मिळाली. माझा कारखाना, नातेवाईकांची घरं तपासली जात आहे. माझ्यावरील ईडीच्या या कारवाई विरोधात कागल बंदची घोषणा कार्यकर्त्यांनी दिली असल्याचेही मला समजलं आहे. त्यामुळे माझी कार्यकर्त्यांनी विनंती आहे, की त्यांनी हा बंद मागे घ्यावा आणि शांताता राखावी. तसेच, कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही वर्तन कार्यकर्त्यांनी करू नसे. कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

चार दिवसांपूर्वी कागलमधील भाजपाचे नेते दिल्लीत जाऊन आले. माझ्यावर कारवाई करावी, असे प्रयत्न त्यांनी केले. एकंदरीतच हे गलिच्छ राजकारण आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, हसन मुश्रीफांच्या घरावर छापे पडल्याचे समजताच कार्यंकर्त्यांनी मुश्रीफ यांच्या घराबाहेर गर्दी केली असून राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच, कागल, मुरगुड बंदची घोषणा केली आहे. तसेच पुढच्या काही तासाभरात राष्ट्रीय महामार्ग बंद करण्याचे आवाहन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com