Jitendra Awhad
Jitendra AwhadTeam Lokshahi

मुख्यमंत्र्यांच्या मुलाशी सांभाळून बोललं पाहिजेत, श्रीकांत शिंदेंना आव्हाडांचा टोमणा

नरेश म्हस्के यांनी सर्व मंत्र्यांच्या गैरकारभाराची चौकशी होणार असल्याचं म्हटले. त्यावर जितेंद्र आव्हाड यांचे प्रत्युत्तर

कळवा पुलाच्या लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. मात्र या लोकार्पणावरून खासदार श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये श्रेयवाद सुरू होता. त्या दोंघाचे कार्यकर्तेही आमने सामने आले होते. पाच वर्षांपूर्वी मी देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली होती. असे जितेंद्र आव्हाड म्हणले. तर मागील अडीच वर्षात पुलाच्या कामाचे काय झाले होते, असा सवाल खासदार श्रीकांत शिंदे विचारला. त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यावरच आता आव्हाड यांनी श्रीकांत शिंदेंना टोमणा मारला आहे.

Jitendra Awhad
भारत जोडो यात्रेतील रितेशने केला खास फोटो शेअर; लोक म्हणतायत, तू का...

खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत शाब्दिक वाद झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आता मुख्यमंत्री यांचा मुलगा आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुलाशी सांभाळून बोललं पाहिजेत. आताचं आम्हाला धमकी मिळाली आहे. किती दिवस जेलमध्ये बसाल तुम्हाला कळणार नाही. आता घाबरले पाहिजे ना. आताचे धमकी दिली ना आम्हाला सगळ्या मंत्र्यांची चौकशी करू. मग बघू तुम्हाला कोण जामीन देतो. धमक्या मिळणार असतील, तर गाव सोडून गेलेलं बरं, असे आव्हाड यावेळी म्हणाले. नरेश म्हस्के यांनी सर्व मंत्र्यांच्या गैरकारभाराची चौकशी होणार असल्याचे म्हटले. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी हे प्रत्युत्तर दिले.

Jitendra Awhad
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी घेतली संभाजी भिडे यांची भेट

कळवा पूल दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झाले होते. पण, मुख्यमंत्र्यांसाठी याचं लोकार्पण झाले नव्हते. यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, ते ठाण्याचे मुख्यमंत्री होते. पहिल्या वास्तूचे उद्घाटन होते. आगाऊपणा करून आमच्या कार्यकर्त्यांनी उघडला नसता तर ते चांगले दिसले नसते. शेवटी मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे, या मताचा मी होतो. इतर अनेक वेळा पुल उघडलेत, आपल्याला माहिती आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com