Rohit pawar
Rohit pawarTeam Lokshahi

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार? काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार यांनी निवडणुकांबाबत मोठे विधान केले

बारामती : येथील कृषी प्रदर्शनात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी निवडणुकांबाबत मोठे विधान केले आहे. मध्यावधी निवडणूका होतील, असं वाटत नाही. पण, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील, असे विधान रोहित पवार यांनी केले आहे. तसेच, त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

Rohit pawar
बहुमत सिद्ध करण्याची वेळ आलीच तर...; बावनकुळेंचे नाना पटोलेंना प्रत्युत्तर

मध्यावधी निवडणुका लागल्याच पाहिजेत म्हणजे लोकांना पक्षांची खरी ताकद कळेल. हे सरकार बदला घेण्यासाठी तयार झालेल सरकार आहे. बदला घेण्यासाठी जे सरकार स्थापन झाले आहे. त्यात व्यक्तीगत हीत जास्त असते, लोकांचे हित नसते. जिथे व्यक्तीगत हित असते, तेव्हा सरकार लगेच पडत नाही. त्यामुळे मध्यावधी निवडणूका होतील, असं वाटत नाही. पण, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची पिछेहाट होतेय, असा सर्व्हे रिपोर्ट आहे. त्यामुळे निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहेत. मोदींनी घेतलेली सभा पाहता पुढच्या काही महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक लागेल अस दिसतयं, असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवाराने बंडखोरी केली यापेक्षाही भाजपला उमेदवार मिळाला नाही, यावरून भाजपची ताकद कमी झाली हे स्पष्ट होतेय. भाजपने ज्या ज्या ठिकाणी एमएलसीचे उमेदवार दिले आहेत. त्यामध्ये शिंदे गटाला कुठेही न्याय मिळाला नाही याचाच अर्थ असा आहे की कोर्टाचा निकाल शिंदे सरकारविरोधात जाईल याची खात्री भाजपाला असल्याने शिंदे गटाला डावलले जातेय का, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

यापूर्वी अनेकांनी मान्य केले आहे की जे जे पक्ष आणि लोक भाजपसोबत जातात त्यांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम होतोच. सध्या शिंदे गटाची ताकत कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावाही त्यांनी केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com