राज्यपालांचे कौतुक करताच मिटकरींनी उडवली बावनकुळेंची खिल्ली
नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी एक विधान केलं. त्या विधानामुळे राज्यभरातून टीकेची झोड राज्यपालांवर केली जात होती. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ सुरु आहे. अशातच आता राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ट्विटरवरून खिल्ली उडवली आहे.
एका दैनिकात बावनकुळेंच्या छापून आलेल्या बातमीचे कात्रण शेअर करत त्याला ‘जोक ऑफ द इयर’ म्हणत मिटकरी यांनी खिल्ली उडवली आहे.
काय आहे त्या बावनकुळेंच्या पोस्टमध्ये?
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने काम करतात. ते जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा तेव्हा ते शिवरायांचा उल्लेख जरूर करतात. त्यांनी कधीही शिवरायांच्या प्रतिमेला ठेच पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही.पण औरंगाबादच्या कार्यक्रमात कोश्यारी जे बोलले त्याचं भारतीय जनता पक्ष समर्थन करत नाही, असं बावनकुळे यांनी म्हटलंय. तोच फोटो मिटकरींनी शेअर केला आहे.