Chandrashekhar Bawankule | Amol Mitkari
Chandrashekhar Bawankule | Amol MitkariTeam Lokshahi

'बावनकुळेजी हे रक्त नेमकं कुणाचं आहे?' 'हा' फोटो शेअर करत मिटकरींचा बावनकुळेंना संतप्त सवाल

'राजकारण महाराष्ट्राचे' 'नर्मदाबाई पटवर्धन' सौरभ पिंपळकर हे ट्विटर अकाउंट कुणाच्या रक्ताचे?
Published by :
Sagar Pradhan

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वासर्वे शरद पवार यांना जीव मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका होत असताना, दुसरीकडे या धमकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. पवारांना धमकी देणारा सौरभ पिंपळकर हा भाजपचा कार्यकर्ता आहे अशी त्याची फेसबुकवर माहिती आहे. असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सांगितले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी एक फोटोच शेअर केलाय. त्यामध्ये तो धमकी देणारा व्यक्ती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत दिसत आहे. त्यावरूनच आता मिटकरी यांनी संतप्त सवाल केला आहे.

काय केला मिटकरींनी सवाल?

राष्ट्रवादीकडून पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता आहे असा आरोप केला जात आहे. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा आरोप फेटाळून लावला. परंतु, आता त्या व्यक्तीबरोबरचा बावनकुळेंचा फोटो मिटकरी यांनी ट्विटरवर शेअर केलाय. सोबतच त्यांनी बावनकुळेंना काही सवाल देखील केले आहेत. ट्विटमध्ये ते म्हणाले की, हे आमच्या रक्तात नाही म्हणणारे बावनकुळेजी हे रक्त नेमकं कुणाचं आहे? पवार साहेबांना धमकी देणारा पिंपळकर तुमच्या बाजूला केक कापतोय , 'राजकारण महाराष्ट्राचे' 'नर्मदाबाई पटवर्धन' सौरभ पिंपळकर हे ट्विटर अकाउंट कुणाच्या रक्ताचे? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com