राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार? फोटोमुळे चर्चांना उधाण

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार? फोटोमुळे चर्चांना उधाण

राष्ट्रवादीचे आमदार अमोल कोल्हे अमोल कोल्हे यांनी एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट शेअर केला आहे. यावरुनच कोल्हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

अमोल धर्माधिकारी | पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवासांपासून रंगल्या होत्या. यावर अजित पवारांनी या चर्चा फेटाळून लावत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अशातच, राष्ट्रवादीचे आमदार अमोल कोल्हे अमोल कोल्हे यांनी एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट शेअर केला आहे. यावरुनच कोल्हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार? फोटोमुळे चर्चांना उधाण
...तर ॲक्शनला रिएक्शन येणारच सभेत; शंभुराज देसाईंचा ठाकरे गटाला इशारा

आज जागतिक पुस्तक दिन आहे. यानिमित्त सोशल मीडियावर अमोल कोल्हे यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये वाचाल तर वाचाल, असे लिहीले आहे. या फोटोच्या एका बाजूला शरद पवार यांचे नेमकचि बोलणे या नावाचे पुस्तक वाचताना अमोल कोल्हे दिसत आहे.

यासोबतच दुसऱ्या बाजूला द न्यू बीजेपी हे पुस्तक वाचतानाचे फोटो अमोल कोल्हेंनी पोस्ट केले आहेत. यावरुन राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले असून अमोल कोल्हे भाजपमध्ये जाण्याची तयारी करत आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, अमोल कोल्हे हे पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. मात्र, गेल्या काही दिवसापासून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यांनी आज केलेल्या पोस्टमुळे भाजपात जाण्याचे संकेत दिल्याचं पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com