MLA Rohit Pawar | Sharad Pawar
MLA Rohit Pawar | Sharad PawarTeam Lokshahi

पुढच्या काळात शिवसेनेसोबत जाण्याचे आदेश नाहीत, पण; रोहित पवारांनी मांडली भूमिका

'येत्या तीन महिन्यात महाराष्ट्रात आमदारकीच्या निवडणुका'
Published by :
Shubham Tate

rohit pawar : येत्या काळातील राजकारणाची सूत्र ही आपल्याच हाती असतील असं सूचक विधान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. रोहित पवार आज जुन्नर दौऱ्यावर होते तिथं जुन्नर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. 2024 नंतरचा काळ हा युवकांचा आहे. युवकांचे दिवस आले की निर्णय सुद्धा आपण घेणार. यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन असेलच पण निर्णय मात्र नवीन पिढीचे राहणार असल्याचे रोहित पवारांनी स्पष्ट केलं. (ncp rohit pawar clarified regarding shivsena)

MLA Rohit Pawar | Sharad Pawar
‘सुपारी’वरुन राणे शिवसेनेत जुंपली, करणार भांडाफोड

राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील सत्तेच्या राजकारणाची गणितं जुन्या नाही तर तरुणांच्या हाती येणार असल्याचे संकेतच भर सभेत रोहित पवारांनी यावेळी दिले. यावेळी तरुणांच्या हातात सत्तेची गणितं आणि निर्णय हे असेलच यासाठी शरद पवार आणि अजित पवार मार्गदर्शन करतील हेही सांगायला रोहित पवार विसरले नाही.

सध्याची परिस्थिती पाहता पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि त्यानंतर लगेचच येत्या 3 महिन्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणुक आहे. त्यानंतर लगेचच आमदारकीच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे, असं भाकीत रोहित पवार यांनी केलं आहे. एका खाजगी कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चांना उधान आलं आहे.

MLA Rohit Pawar | Sharad Pawar
राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका, 'त्या' ठरावाचा पश्चाताप वाटतो का? यावर म्हणाले...

यावेळी बोलताना ते म्हणाले की, ज्या उद्देशाने महाविकास आघाडी अस्तित्वात आली होती तो उद्देश सत्ता संपुष्टात आल्याने राहिलेला नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सत्ता म्हणून महाविकास आघाडी अस्तित्वात नाही. परंतु महाविकास आघाडी संघटन म्हणून अस्तित्वात असायला पाहिजे असं अनेकांना वाटतं. पुढच्या काळात शिवसेनेसोबत जाण्याचे आदेश नाहीत. मात्र स्थानिक परिस्थिती घेऊन निर्णय घेतले जातील, असेही रोहित पवारांनी स्पष्ट केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com