Nitesh Rane : रस्त्याचे डांबर पाण्यात विरघळले..., नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर ट्वीटरवरुन टीका

Nitesh Rane : रस्त्याचे डांबर पाण्यात विरघळले..., नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर ट्वीटरवरुन टीका

राज्यात उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जात सत्ता स्थापन केली.
Published by :
Shweta Chavan-Zagade

राज्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे महाविकास आघाडीचे (mahavikas ) सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी भाजप सोबत जात सत्ता स्थापन केली. राज्याच्या सत्तेत भाजपाने पुन्हा एकदा बाजी मारली. शिवसेनेचे आमदार, खासदार आणि नगरसेवक हे शिंदे गटाला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे शिवसेनेची गळती रोखण्यासाठी युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेची सुरूवात केली आहे. 19 जुलैला शिंदे गटातून वरूण सरदेसाई यांची युवासेना अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान, रस्त्याचे डांबर पाण्यात विरघळले, अशी खोचक टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.

Nitesh Rane : रस्त्याचे डांबर पाण्यात विरघळले..., नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर ट्वीटरवरुन टीका
IND vs SA T-20 : चौथ्या टी-20 सामन्यात भारत विजयी; मालिका बरोबरीत

काय म्हणाले नितेश राणे?

रस्त्याचे डांबर पाण्यात विरघळले. तरी आदित्य सेना म्हणते आम्ही करून दाखवले, असं ट्विट नितेश राणेंनी करत आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

Nitesh Rane : रस्त्याचे डांबर पाण्यात विरघळले..., नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर ट्वीटरवरुन टीका
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्यासाठी आमदारांकडे 100 कोटींची मागणी

मुंबईमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी १२ खासदारांनी शिंदे गटाला पाठींबा दिल्यानंतर बोलताना ही टीका केली. घोटाळे आणि लफडी तुम्ही केली आणि त्यापासून वाचण्यासाठी पक्षप्रमुखांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, असंआदित्य ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com