हिंदुत्वादी सरकार, नाद नाही करायचा : नितेश राणे

हिंदुत्वादी सरकार, नाद नाही करायचा : नितेश राणे

शिवप्रताप दिनीच जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने मोठी कारवाई करत प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरीजवळील अतिक्रमण पाडले आहे

मुंबई : शिवप्रताप दिनीच जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने मोठी कारवाई करत प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरीजवळील अतिक्रमण पाडले आहे. या कारवाईचे सर्वच स्तरांतून स्वागत केले जात असून भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहे. महाराष्ट्रात हिंदुत्वादी सरकार आहे. नाद नाही करायचा, असे ट्विट त्यांनी केले आहे.

हिंदुत्वादी सरकार, नाद नाही करायचा : नितेश राणे
आदित्य ठाकरेंनी जेजुरी गडावर उचलली खंडा तलवार

नितेश राणे म्हणाले की, शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने प्रतापगडाच्या पायथ्याशीअफझल खानाचे थडगजवळील अतिक्रमण ते हटविण्यात यावे, अशी शिवप्रेमींची वर्षानुवर्षे मागणी होती. ते हटविण्याचा निर्णय अनेक वर्षांआधीच उच्च न्यायालयाने व सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. पण कोणत्याही सरकारने ते करण्याची हिंमत केली नाही. पण, आज महाराष्ट्रात हिंदुत्वादी विचारांचे सरकार आहे. आज या सरकारने ऐतिहासिक क्षण आम्हा शिवप्रेमींना अनुभवयास दिले. त्यांसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानतो. जिथे-जिथे अशी आतिक्रमणे आहेत ती हटविण्यात यावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.

दरम्यान, प्रतापगड पायथ्याजवळील अफजलखान थडग्यानजीक केलेलं अतिक्रमण मोठ्या पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केलं आहे. ही कारवाई आज पहाटे 4 वाजता करण्यात आली असून यासाठी हजारोंच्या संख्येने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सांगली,कोल्हापूर, सोलापूर, पुणे सातारा या ठिकाणाहून जवळपास 2 हजार पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. या घटनेने जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. प्रतापगड किल्ला परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com