nitesh rane
राजकारण
ठाकरे सरकारने मला मारण्याचा प्रयत्न केला: नितेश राणे
मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये महाविकासआघाडी विरूद्ध भाजप असा संघर्ष सातत्याने पाहायला मिळतोय. त्यातंच आज भाजपचे आमदार नितेश राणे ह्यांनी आज 'ठाकरे सरकारचा मला मारण्याचा प्लॅन होता असा' गंभीर आरोप केला आहे.
काय म्हणाले नितेश राणे?
'कोल्हापूर रुग्णालयात असताना चुकीचं औषध देऊन मारण्याचा प्लान होता. दरम्यान, हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्याने सावध केल्याने माझे प्राण वाचले. ह्या प्रकरणात गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी लक्ष घालावे असंही ते म्हणाले.