'सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका, मी सरकार आहे म्हणून सांगतो'

'सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका, मी सरकार आहे म्हणून सांगतो'

नितीन गडकरी यांचे नागपूरमधील कार्यक्रमात वक्तव्य

कल्पना नालस्कर | नागपूर :  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची वक्तव्य नेहमीच चर्चेत असतात. आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी गडकरींना ओखळले जाते. आजही एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले, सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका, मी सरकार आहे म्हणून सांगतो.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपुरातील अॅग्रो व्हिजन फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना संबोधित करत होते. यावेळी बोलतांना गडकरी म्हणाले की, मी कालच माझ्या शेतातील चवळीच्या शेंगाची भाजी खालली, ऑरगॅनिक आहे. मी नागपूरतील प्रतापनगरवाला भाजीवाला आहे तो पकडला आहे. तो 30-35 रुपये मला भाव देतो आणि मी माझी भाजी त्याच्याकडे देतो, तिथून माझा मार्केट इस्टॅब्लिश झाला आहे. मी ऑरगॅनिक म्हणून सर्टिफाईड नाहीये. पण, माझी भाजी ऑरगॅनिक आहे. त्याची चव आणि क्वालिटी चांगली आहे. मी माझा बाजार स्वतः शोधला त्यामुळे फार काही सरकारच्या भरोशावर राहू नका. मी सरकार आहे म्हणून सांगतो, असं वक्तव्य त्यांनी केले आहे.

आपला विश्वास सरकार आणि देवावर असतो. पण, जोपर्यंत आपण प्रयत्न करणार नाही. तोपर्यंत आपल्याला मार्ग मिळणार नाही, असा सल्ला यानिमित्ताने नितीन गडकरी यांनी दिला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीही नितीन गडकरींचे विधान चर्चेचा विषय बनला होता. पुण्यातील वाहतुकीच्या समस्येवर नितीन गडकरींनी एक भन्नाट आयडिया मांडली होती. आम्ही 165 रोप वे केबल कार बांधतोय. आमच्याकडे हवेत उडणारी बस आहे. त्यात 150 लोक बसतात आणि ती वरच्यावर जाते. पुण्यात उडत्या बसची योजना आणली, तर पुण्यातल्या वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास फायदा होईल, असे त्यांनी म्हंटले होते. परंतु, या विधानावरुन नितीन गडकरींना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले.

Lokshahi
www.lokshahi.com