संजय राऊतांचा दसरा मेळावा कोठडीतच; मुक्काम वाढला

संजय राऊतांचा दसरा मेळावा कोठडीतच; मुक्काम वाढला

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांना दिलासा नाहीच

मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा कारागृहामध्ये मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने 10 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला संजय राऊतांना मुकावे लागणार आहे.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांची कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी राऊतांच्या जामीन अर्जावर युक्तीवाद करण्यात आला. परंतु, ही सुनावणी 10 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

दरम्यान, राज्यात दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे घेण्यावरुन शिंदे गट आणि शिवसेनेत संघर्ष पेटलेला असताना शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होतो ही परंपरा आहे. परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी पार्कमध्ये मेळावा घ्यावा, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला होता. हा वाद मुंबई उच्च न्यायालयात गेला असता शिवसेनेच्या बाजूने निकाल लागला. व शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, या मेळाव्याला संजय राऊत यांना उपस्थित राहता येणार नाही.

काय आहे पत्राचाळ प्रकरण?

पत्राचाळ येथे म्हाडाचा भुखंड होता. हा भुखंड विकसित करण्यासाठी आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम दिले होते. पण त्यांनी ही जागा परस्पर खाजगी विकासकांना विकली. पत्राचाळमधील 672 रहिवाशींना 650 स्केअर फुटाचे घर देण्यात येणार होते. त्यांच्या या सोसायटीत अनेक अॅनिमिटी देण्यात येणार होत्या. रहिवाशांना 25 कोटी रुपये कार्पस फंड देण्यात येणार होते. त्यातून रहिवाश्यांचे मासिक मेंटेनेंस भरला जाणार होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com