Sanjay Raut
Sanjay Raut Team Lokshahi

संजय राऊतांविरोधात मोठी कारवाई! अजामीनपात्र वॉरंट जारी

मेधा सोमय्यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यावर वॉरंट

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यावर न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे. पुढील सुनावणी 24 जानेवारी रोजी होणार आहे.

Sanjay Raut
मी योगीजी म्हणालो, औरंगजेबजी नाही; आदित्य ठाकरेंचा बावनकुळेंना टोला

मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याच्या सुनावणीवेळी संजय राऊत हे आज कोर्टात हजर राहिले नाहीत. संजय राऊत यांच्या वकिलांकडून न्यायालयात हजर होण्यासाठी वेळ वाढवून मागण्यात आला होता. परंतु, कोर्टाने वेळ वाढवून देण्यास नकार दिला. सोमय्या यांच्या वकिलांनी संजय राऊत यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्याची मागणी न्यायालयापुढे ठेवली आहे. मेधा सोमय्या यांचे आज शिवडी न्यायालयात स्टेटमेंट रेकॉर्ड केले आहे.

Sanjay Raut
जर तुमचे कारनामे मी बाहेर काढले तर ५० वर्ष जेलबाहेर येणार नाही' संजय राऊतांचा नारायण राणेंना इशारा

संजय राऊत यांनी माझ्यावर खोटे आरोप करून माझी बदनामी केल्यामुळे मी राऊत यांच्या विरोधात तक्रार केली आहे. राऊत यांनी 12 एप्रिल 2022 रोजी सामना ऑनलाइनमध्ये एक लेख लिहून माझ्यावर कोट्यवधींचा शौचालय घोटाळा केल्याचा खोटा आरोप केला होता. यामुळे माझी बदनामी झाली आहे. मेधा सोमय्या यांनी आपल्या राजकीय ताकदीचा वापर करून मीरा-भाईंदर परिसरात 16 शौचालये बांधण्याचे कंत्राट घेतल्याचे लेखात म्हटले आहे.

या लेखामुळे माझ्यावर खूप मानसिक त्रास झाला. आणि या लेखानंतर माझे नातेवाईक, मित्र सर्व माझ्याकडे संशयाने पाहू लागले आणि माझी विचारपूस करू लागले. त्यामुळे समाजात माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी झाली. या लेखानंतर मला लोकांसमोर जायला लाज वाटू लागली. याने माझी मानहानी झाली आहे. मी प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करते, असे मेधा सोमय्यांनी न्यायालयात स्टेटमेंट दिले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com