Eknath khadse
Eknath khadse Team Lokshahi

राष्ट्रवादीत एक गट नाही तर पन्नास गट - एकनाथ खडसे

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विधानावर खडसेंचे उत्तर

राज्यात सध्या राजकारणात प्रचंड खलबतं घडताना दिसत आहे. अशातच मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट असल्याचे वक्तव्य केलं होतं. याच विषयावर बोलताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीत एक-दोन नाही तर तब्बल पन्नास गट आहेत, यात माझाही एक वेगळा गट असल्याचं वक्तव्य करत एकनाथ खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटीलांवर जोरदार टीका केली.

Eknath khadse
यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिंदेंकडे? परवानगीसाठी बीएमसीकडे अर्ज

काय म्हणाले नेमकं खडसे ?

एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी गुलाबराव पाटीलांवर निशाणा साधला. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ५० आमदारांचे पन्नास गट असल्याच एकनाथ खडसे माझाही वेगळं गट असल्याचेही खडसे म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी पक्षांमध्ये एक गट आणि दोन गट नसतात. पक्ष एकच असतो, एक संघाचा असतो मात्र वैचारिक मतभेद असू शकतात. व्यक्तिगत मतभेद असू शकतात मात्र याचा अर्थ पक्षांमध्ये मतभेद असू शकतात असा आरोप करणे चुकीच आहे, असं बोलत त्यांनी यावेळी स्पष्टीकरण दिले.

Eknath khadse
दसरा मेळाव्याला राज ठाकरेंनी शिवतीर्थावर संबोधित करावे; मनसे सैनिकाची मागणी

फडणवीस आणि चव्हाण यांच्या भेटीवर केलं भाष्य

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारल्या खडसे म्हणाले की, मी सुद्धा नाशिकला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. राजकारणात भेटीगाठी संस्कृती ही असतेच. राज ठाकरेंना सगळेच भेटतात अशोक चव्हाण यांना सगळेच भेटतात. मीही कधीतरी कामानिमित्ताने एकनाथ शिंदे यांना भेटेल , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही विकासकामानिमित्ताने मी भेट घेऊ शकेल. मात्र याचा काही वेगळा अर्थ काढू नये असं मला वाटतं, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी बोलताना दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com