जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हाच गृहमंत्री करा म्हंटले होते, पण...: अजित पवार

जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हाच गृहमंत्री करा म्हंटले होते, पण...: अजित पवार

मनातली खदखद कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली?

अमोल धर्माधिकारी | पुणे : जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हाच गृहमंत्री करा म्हंटले होते, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. पुणे शहर कार्यकारीणी आढावा बैठक आज होत असून यावेळी ते बोलत होते. तर, वरिष्ठांनाही वाटतं याला गृहमंत्रीपद दिलं तर हा आपलंही ऐकणार नाही, असे अजित पवारांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला होता. परंतु, यानिमित्ताने अजित पवारांनी मनातली खदखद कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली असल्याची चर्चा आता होत आहे.

काय म्हणाले अजित पवार?

बैठकीत अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असतानाच स्टेजवरील एका कार्यकर्त्याने तुम्हीच गहमंत्री व्हा, असे म्हंटले. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, जेव्हा जेव्हा सरकारमध्येही उपमुख्यमंत्री केले, तेव्हा मी वरिष्ठांना म्हंटले की माझ्याकडे गृहखाते द्या. पण, वरिष्ठांना वाटते की याला गृहखाते दिले की हा आपले पण ऐकायचे नाही, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला होता. पुढे ते म्हणाले, मला जे योग्य वाटेल ते स्वीकारलं. यात राष्ट्रवादीचा जरी चुकला दादा पोटात घ्या पोटात घ्या पोटात नाही आणि मोटात नाही. सर्वांना नियम सारखेच आहे.

आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर मी जीवाचे रान करेल. त्याच्या पाठिशी उभा राहील. पण तोच जर चुकीचा असेल तर मी त्याच्यावर पांघरुण घालणार. पांघरुन संपतील. त्यामुळे तसे काही होणार नाही. पण, आपल्याला काय हे जमले नाही, असे त्यांनी सांगितले.

याहीवेळेस म्हंटल राव गृहखाते द्या. पहिल्यांदा अनिलराव (देशमुख) ते गेल्यानंतर म्हंटल मला गृहमंत्रीपद द्या तरी पण दिलं नाही. वळसे पाटलांना दिलं. वरिष्ठांपुढे बोलता येत नाही. असे म्हणताच त्यांनी दोन्ही कानाना स्पर्श केला. आणि पुन्हा सभागृहात हशा पिकला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com