लोकसभेतून अधीर रंजन चौधरींसह 33 विरोधी खासदारांचं निलंबन; कारण काय?

लोकसभेतून अधीर रंजन चौधरींसह 33 विरोधी खासदारांचं निलंबन; कारण काय?

लोकसभेत गदारोळ केल्याने विरोधी पक्षातील अनेक खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : लोकसभेत गदारोळ केल्याने विरोधी पक्षातील अनेक खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांच्यासह ३३ विरोधी खासदारांना सोमवारी निलंबित करण्यात आले आहे. या खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मांडला होता. यानंतर आवाजी मतदानाने मान्य करण्यात आला.

लोकसभेतून अधीर रंजन चौधरींसह 33 विरोधी खासदारांचं निलंबन; कारण काय?
दुष्काळात तेरावा महिना म्हणजे आताच सरकार; उध्दव ठाकरेंचा घणाघात

संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी विरोधी पक्षाच्या एकूण 33 खासदारांना निलंबित करण्यात आले. यापैकी 30 खासदारांना सभागृहाच्या संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. तर उर्वरित तीन के. जयकुमार, विजय वसंत आणि अब्दुल खालिक यांना विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. या तीन खासदारांवर सभापतींच्या व्यासपीठावर चढून घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे.

कोणत्या खासदारांना निलंबित करण्यात आले?

टी. सुमाथी, कल्याण बॅनर्जी, ए राजा, दयानिधी मारन, अपरूपा पोद्दार, प्रसून बॅनर्जी, ईटी मोहम्मद बशीर, जी. सेल्वम, सीएन अन्नादुराई, अधीर रंजन चौधरी, असित कुमार मल, कौशलेंद्र कुमार, अँटो अँटोनी, एसएस पलानीमनिकम, अब्दुल खालिक, थिरुनावुक्करासर, प्रतिमा मंडल, काकोली घोष, के. मुरलीधरन, सुनील मंडल, एस. रामलिंगम, के. सुरेश, अमर सिंग, राजमोहन उन्नीथन, गौरव गोगोई, टीआर बालू, के कानी नवस, के वीरस्वामी, एनके प्रेमचंद्रन, सौगता रॉय, शताब्दी रॉय, के जयकुमार.

दरम्यान, याआधी विरोधी पक्षाच्या एकूण 14 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्यापैकी 13 लोकसभा आणि एक राज्यसभेचा खासदार होता. तसेच संसदेच्या संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी त्यांना निलंबित करण्यात आले होते. तर या अधिवेशनात आतापर्यंत एकूण 47 विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com