विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पामधून घोषणा होण्याची शक्यता आहे. अंतरिम अर्थसंकल्पात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. फडतुसांच्या राज्यात काडतुसांची गर्दी असे फलक हातात घेत आंदोलन करण्यात येत आहे. जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com