Imran Khan
Imran KhanTeam Lokshahi

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

अनेक दिवसांपासून होती अटकेची टांगती तलवार, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारवाई
Published by :
Sagar Pradhan

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या बाहेरून रेंजर्सनी अटक केली आहे, असे पाकिस्तानच्या डॉन न्यूजने वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इम्रानला अटक केल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. न्यायालयाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. इम्रान खान यांचे वकील आणि समर्थकांनाही मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे वकील फैसल चौधरी यांनी इम्रान खान यांच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘अलकादिर ट्रस्ट केस’ भ्रष्टाचार प्रकरणात इम्रान खान यांना अटक करण्यात आलीय. पीटीआय पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या पक्षाचे समर्थक नाराज झालेत. पीटीआयने इम्रान खान यांच्या अटकेनंतर विरोध प्रदर्शनाची घोषणा केली आहे.

इम्रान खान यांच्या अटकेनंतर इस्लामाबाद पोलिसांनी स्टेटमेंट जारी केलय. कादिरा ट्रस्ट केस प्रकरणात इम्रान खान यांना अटक झाल्याचं इस्लामाबादच्या आयजींनी सांगितलं. सध्या परिस्थिती सामान्य आहे. कलम 144 लागू करण्यात आलं आहे, असं आयजींनी सांगितलं. कोणी नियमांच उल्लंघन केलं, तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असं आयजी म्हणाले.

काय आहे अल-कादिर ट्रस्ट प्रकरण?

हा विद्यापीठाचा विषय आहे. इम्रान खान यांनी पंतप्रधान असताना कोटय़वधी रुपयांची जमीन बेकायदेशीरपणे उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात त्यांना अटक झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com