अजितदादा की फडणवीस; कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेचा मान कोणाला मिळणार?

अजितदादा की फडणवीस; कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेचा मान कोणाला मिळणार?

यंदा कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबर रोजी येणार असून याच्या तयारीसाठी काल मंदिर समितीची बैठक झाली.
Published by :
Siddhi Naringrekar

यंदा कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबर रोजी येणार असून याच्या तयारीसाठी काल मंदिर समितीची बैठक झाली. राज्यात आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री आहेत. कार्तिकीच्या शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी दाम्पत्याच्या हस्ते केली जाते. यावर्षी दोन उपमुख्यमंत्री असल्याने हा मान कोणाला द्यायचा हा प्रश्न मंदिर समितीला पडला आहे.

गेल्या कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली होती. त्यामुळे आता हा पूजेचा मान कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com