पंकजा मुंडेंच्या सभेत 'सीएम सीएम'च्या घोषणा

पंकजा मुंडेंच्या सभेत 'सीएम सीएम'च्या घोषणा

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान गडावर पार पडत आहे. या मेळाव्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान गडावर पार पडत आहे. या मेळाव्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी सीएम सीएमच्या घोषणा दिल्या. या घोषणांनी सर्वांचेच लक्ष वेधले. या मेळाव्याला संबोधित करताना पंकजा मुंडे यांच्या माईकचा आवाज बंद झाला. यादरम्यान या घोषणा देण्यात आले.

पंकजा मुंडेंच्या सभेत 'सीएम सीएम'च्या घोषणा
...तर सरकारला किंमत मोजावी लागेल; शरद पवारांचा इशारा

शिवशक्ती परिक्रमा जेव्हा काढली तेव्हा मला वाटलं नव्हतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढे भव्य स्वागत होईल. मुंडे साहेब नेहमी म्हणायचे मी माझ्या कातड्याचे जोडे जरी केले तरी तुमचे उपकार कधीच भेटू शकणार नाही. माझ्या कारखान्यावर रेड झाली तेव्हा दोन दिवसात 11 कोटी रुपयांची चेक तुम्ही जमा केले. पण माझ्याकडे तुम्हाला बसायला द्यायला साधी सतरंजी सुद्धा नाही. तुम्हाला मला काही खाऊ घालता येत नाही. तुम्ही उन्हात आहात म्हणून आम्ही देखील उन्हात थांबलो आहोत, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

याचदरम्यान पंकजा मुंडे यांच्या भाषणात माईकमध्ये तांत्रिक बिघाड झाला. मुख्य डायस सोडून हातात माईक घेऊन पंकजा मुंडे यांनी भाषण सुरू केले. कोण घुसला माझ्या मेळाव्यात कोणी वायर बंद केलं. कोणी माझी वायर कापली, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला. पण माझा आवाज कुणीही दाबू शकणार नाही, असेही पंकजा मुंडे यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com