मराठा आरक्षणावर Pankaja Munde म्हणाल्या...

मराठा आरक्षणावर Pankaja Munde म्हणाल्या...

सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय. पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमेची यात्रा सुरु आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय. पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमेची यात्रा सुरु आहे. यात मराठा आंदोलकांनीही पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचं निवेदन दिलं आहे. पंकजा मुंडे यांनी सोलापूरमध्ये असताना मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, सर्व लेकरांना विनंती करते. आरक्षणाची मागणी करा. संवैधानिक अधिकाराने आंदोलने करा, मागणी करा. पण स्वत:चा जीव देऊ नका. जीआर खरंच काढला का? मी परिक्रमेत आहेत. मी जीआर पाहिला नाही. मला त्याबाबत अधिक माहीत नाही. असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com