Pankaja Munde
Pankaja MundeTeam Lokshahi

मंत्रीपदाबाबत पंकजा मुंडे यांचे विधान म्हणाल्या, आपल्याला मिळाले पाहिजे अशी चर्चा असणे गैर नाही

राष्ट्रवादी जाण्याबाबत केलं भाष्य

राज्यात एकीकडे प्रचंड राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. अनेक विषयावरून सध्या राजकरण ढवळून निघाले आहे. याच घडामोडींवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी लोकशाहीला विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक मोठ्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत गौप्यस्फोट देखील केले आहे.

Pankaja Munde
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष- बावनकुळे

या मुलाखतीत त्यांना लोकशाहीच्या प्रतिनिधींनी तुम्ही नाराज असल्याच्या चर्चा नेहमी होत असतात? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, माझा चेहरा पहा आणि सांगा मी नाराज आहे का? माझा चेहरा अगदी फ्रेश आहे. असे उत्तर यावेळी बोलताना त्यांनी दिले.

पुढे त्यांना शिंदे सरकारमध्ये तुम्ही मंत्रिमंडळात जाण्यासाठी इच्छुक आहात का? त्यावर त्या म्हणाल्या की, चर्चा मी मंत्रिमंडळात असल्याच्या होत्या. मी इच्छुक असल्याच्या नव्हत्या. आपल्या नावाची चर्चा असणे गैर नाही, आपल्याला मिळाले पाहिजे अशी चर्चा असणे सुद्धा गैर नाही. का मिळालं अशी चर्चा ज्या दिवशी झाली त्या दिवशी विचार करावं लागेल. असे विधान मुंडे यांनी उत्तर देताना केलं.

Pankaja Munde
Maharashtra Board Exam Time Table : दहावी बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

राष्ट्रवादीमध्ये जाण्याबाबत त्या बोलताना म्हणाल्या की, मी जाणार आहे की नाही या बाबत आमच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. त्या फक्त चर्चा होत्या आणि त्या माझ्याबद्दल होत्या मी एवढच सांगेल.

पुढे त्यांनी यंदाच्या होणाऱ्या भगवान गडावरील दसऱ्या मेळाव्याबाबत भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, मला दसरा मेळाव्याची फारसी चर्चा कारवी लागत नाही. लोकांना आव्हान केलं तरी पुरेसं असतं. हा दसरा मेळावा लोकांसाठी असतो, तो त्यांच्या आग्रहासाठीच केलेला असतो. पुढे बोलताना त्यांनी करुणा शर्मा भगवान गडावर यंदा दसरा मेळावा घेणार असल्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं. त्यावेळी त्या म्हणाल्या की, हा भगवान गडाचा विषय आहे. कोणी कुठेही मेळावा घ्यावा, यावर माझं मत महत्वाचे नाही.

Lokshahi
www.lokshahi.com