पंकजा मुंडेंनी फडणवीसांच्या कार्यक्रमाला मारली दांडी

पंकजा मुंडेंनी फडणवीसांच्या कार्यक्रमाला मारली दांडी

विनायक विनायक मेटे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात फडणवीसांनी हजेरी लावली आहे. मात्र, पंकजा मुंडेंनी पाठ फिरवली आहे. यामुळे राजकीय चर्चांनी जोर धरला आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

विकास माने | बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगत आहे. अशातच, त्यांना अनेक पक्षांकडून प्रवेशाच्या ऑफरही करण्यात आल्या आहेत. परंतु, पंकजा मुंडे यांनी आपण भाजपसोबत असल्याचे सातत्याने सांगितले आहे. असे असले तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये काही आलबेल नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आजही विनायक विनायक मेटे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात फडणवीसांनी हजेरी लावली आहे. मात्र, पंकजा मुंडेंनी पाठ फिरवली आहे. यामुळे राजकीय चर्चांनी जोर धरला आहे.

पंकजा मुंडेंनी फडणवीसांच्या कार्यक्रमाला मारली दांडी
मंत्रिमंडळ विस्तार लवकर केलं पाहिजे नाहीतर...; बच्चू कडूंचे मोठे विधान

दिवंगत विनायक मेटे यांच्या जयंतीनिमित्त बीड मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होत असून इतर पक्षातील पदाधिकारी उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस कार्यक्रम स्थळी दाखल झाले असून समाधी स्थळी नतमस्तक झाले आहे. पंकजा मुंडे मात्र अद्याप इथे दाखल झालेल्या नाहीत. आष्टी येथे मोदी @ 9 या नियोजित कार्यक्रमाला पंकजा मुंडे गेल्या असल्याचं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या निमित्ताने पुन्हा एकदा फडणवीस मुंडे यांच्यातील दुरावा पाहायला मिळला आहे.

दरम्यान, दिवंगत विनायक मेटे यांच्या समाधी स्थळी पंकजा मुंडे दुपारीच दाखल होत नतमस्तक झाल्या. मेटे यांच्या आठवणींना उजाळा देत मेटेंच्या पत्नी बरोबर चर्चा केली. तर एका सभेत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी फेटा बांधणार नाही. आपल्याला दुधही पोळलेलं असून ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे २०२४ हे वर्ष इतिहास घडवणारं म्हणजेच इतिहास बदलणारं वर्ष आहे, अशी सूचक विधान त्यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com