उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या की...

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या की...

बीडमधून पंकजा मुंडे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलीय. भाजपने महाराष्ट्रातील २० उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये बीडमधून पंकजा मुंडे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, काल उमेदवारी जाहीर झाली. एवढ्या मोठ्या राजकीय पक्षाची उमेदवारी मिळणे ही सन्मानजनक बाब आहे. थोडी संमिश्र भावना आहे. प्रीतम मुंडे या १० वर्षे राजकारण करत होत्या. नवीन झोनमध्ये मी जात आहे, हुरुर व धाकधूक आहे. मला अपेक्षा नव्हती. अशा चर्चा बऱ्याच दिवसांपासून होती. पक्षाची सही होऊन जोपर्यंत उमेदवारी घोषणा होत नाही तोपर्यंत माझा विश्वास नसतो. प्रीतम मुंडे या डॉक्टर करिअर सोडून राजकारण करत होत्या. दोघींचे कॉम्बिनेशन छान होते. धोरणात्मक निर्णय मी करायची, व्यक्तिगत कामे त्या करायच्या, प्रीतम ताईंना वाट पाहावी लागणार नाही असे त्या म्हणाल्या.

राज्यसभेवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, याबाबत मी भाष्य करणे अनुचित आहे. याआधी १० वेळा राज्यसभा व विधानपरिषदेच्या निवडणूक झाल्या. त्यामुळे यावर मी बोलणार नाही. बीड जिल्ह्याची जनता काय करेल याकडे लक्ष आहे या प्रवासाची मला उत्सुकता आहे. संघर्षाने प्रीतमची निवडणूक जिंकलो होतो.यावेळी काय परिस्थिती हे पाहावे लागेल. दुसऱ्यांसाठी लढले आहेत. आता स्वतःसाठी लढायचे आहे. आमची युती आहे, जिल्ह्यात एकत्रित आहोत. लोकसभा मिळाली आहे. आता अधिक मताने निवडून येईल आता संवाद खुप होतोय मी रोज बोलतेय पक्षाने जबाबदारी दिली आहे जबाबदारीचा सन्मान मानते.

मी लोकसभेमध्ये नव्हे तर माझ्या राजकीय जीवनामध्ये सर्व समाजांना सोबत घेऊन काम केलं आहे. माझ्या पालकमंत्री काळामध्ये ज्यावर मला २० मतं पडली त्यांना पण मी तेवढाच निधी दिला आहे. जेव्हा आपण एका संविधान पदावर जातो तेव्हा आपण कोणत्या एका पक्षाचे नाही, कोणत्या एका जातीचे नाही, कुठल्या एका विचाराचे नसतो आपण त्या जिल्ह्याचे किंवा राज्याचे किंवा त्या देशाचे असतो. मी माझ्या बीड समाजामध्ये सर्वांना एकत्र घेऊन चालते आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com