आनंदीबाई जोशींऐवजी अभिनेत्रीचा फोटो; नारायण राणेंचं ट्वीट पुन्हा एकदा चर्चेत

आनंदीबाई जोशींऐवजी अभिनेत्रीचा फोटो; नारायण राणेंचं ट्वीट पुन्हा एकदा चर्चेत

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं ट्वीट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं ट्वीट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशींच्या स्मृतिदीनानिमित्त अभिवादन करताना राणेंनी आनंदीबाईंऐवजी आनंदी गोपाळ या चित्रपटात आनंदीबाईंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा फोटो पोस्ट करून अभिवादन केलं आहे.

या पोस्टमधल्या चित्रात मूळ आनंदीबाईंचा फोटो बॅकग्राऊंडला वापरला असला तरी तो अत्यंत पुसट आहे आणि अभिनेत्री म्हणून काम केलेल्या भाग्यश्री मिलिंद यांचा फोटो जास्त मोठा आणि स्पष्ट आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे ट्वीट करत भारतातील पहिल्या महिला डॉक्टर यांना अभिवादन केलं आहे. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा बहुमान मिळविणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com