Pm Modi |swami vivekananda| bjp mla
Pm Modi |swami vivekananda| bjp mlaTeam Lokshahi

पंतप्रधान मोदी हे स्वामी विवेकानंदांचे नव्या रूपातील अवतार, भाजप खासदाराचे विधान

पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने देशाची आणि लोकांची सेवा करत आहेत, ते पाहता ते आधुनिक भारताचे स्वामी विवेकानंद आहेत.
Published by :
Sagar Pradhan

राज्यासह देशातील राजकारणात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच दुसरीकडे एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानांचे सत्रदेखील राजकीय मंडळींकडून सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारतीय जनता पक्षाच्या एका खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना मोठे विधान केले आहे.

Pm Modi |swami vivekananda| bjp mla
उमेदवार बदलला ही माहिती माध्यमातून कळली, तांबेंच्या उमदेवारीवर पटोलेंचे भाष्य

भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगालमधील बिशनपूर येथील खासदार सौमित्र खान म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वामी विवेकानंदांचे नव्या रूपातील अवतार आहेत. स्वामी विवेकानंद हे आपल्यासाठी देवासारखे आहेत. पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने देशाची आणि लोकांची सेवा करत आहेत, ते पाहता ते आधुनिक भारताचे स्वामी विवेकानंद आहेत, असे म्हणता येईल. असे ते म्हणाले आहे.

दुसरीकडे, कर्नाटकातील हुबळी येथे पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वामी विवेकानंदांकडून प्रेरणा घेऊन अमृतकाळात भारताला पुढे नेणे हा भारतीय तरुणांचा मंत्र आहे. स्वामी विवेकानंद यांचा कर्नाटकशी सखोल संबंध होता आणि त्यांनी अनेक प्रसंगी या प्रदेशाला भेट दिली होती. म्हैसूरच्या महाराजांनीही स्वामीजींना त्यांच्या परदेश दौऱ्यात साथ दिली. असे पंतप्रधान म्हणाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com