Narendra Modi
Narendra Modi Team Lokshahi

गुजरात निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदी यांचा नवा नारा 'मैंने ये गुजरात बनाया है'

एक आणि पाच डिसेंबर रोजी गुजरातमध्ये मतदान होणार आहे. तर 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

देशात सध्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच या निवडणुकीसाठी दोन्ही राज्यात सर्व राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरु केली आहे. या दोन्ही निवडणुकीत गुजरात निवडणुकीवर सर्वांचे सर्वाधिक लक्ष आहे. कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ वर्ष या राज्यात मुख्यमंत्री राहिले आहे. त्यामुळे या गुजरात निवडणुकीला जास्त महत्व मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये आज एक नवीन नारा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील वलसाड येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी गुजरातीमध्ये 'मैंने ये गुजरात बनाया है' असा नवीन निवडणूक नारा दिला. 25 मिनिटांच्या प्रदीर्घ भाषणात पीएम मोदींनी लोकांना हा नारा अनेकवेळा लावला. गेल्या 20 वर्षांपासून राज्याची बदनामी करण्यात घालवणाऱ्या फुटीरतावादी शक्तींना गुजरात नेस्तनाबूत करेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

द्वेष पसरवण्यात गुंतलेल्या, गुजरातला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या फुटीर शक्तींना गुजरातमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या निवडणुकीतही त्यांचे भवितव्य ठरणार आहे. 'दिल्लीत बसून मला इनपुट मिळत आहेत की भाजप यावेळी विक्रमी फरकाने गुजरात जिंकेल. माझा पूर्वीचा विक्रम (भाजपच्या विजयाच्या फरकाने) मोडण्यासाठी मी येथे आलो आहे. मी प्रचारासाठी तयार असल्याचे गुजरात भाजपला सांगितले आहे. मी शक्य तेवढा वेळ देईन. असे ते म्हणाले आहे.

पीएम मोदी पुढे म्हणाले की, गुजरातच्या तरुणांनी आपल्या हातात कमांड घेतली आहे. गुजरातमध्ये द्वेष पसरवणारे कधीच निवडून आलेले नाहीत. काही लोक राज्याची बदनामी करण्यात मग्न आहेत. गुजरातची जनता त्या लोकांना धडा शिकवेल. माझ्या आदिवासी बांधवांच्या आशीर्वादाने मी गुजरातमधील रॅलीची सुरुवात करत आहे, हे माझे भाग्य आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com